नगर अर्बन बँकेतील अपहार आम्ही उघड केला त्यात आम्ही आरोपी कसे?

तिघा डॉक्टरांचा न्यायालयात सवाल
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - नगर अर्बन बँकेतील अपहार सर्वात आधी आम्हीच उघड करून चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतू बँकेने मात्र आम्हालाच आरोपी केले. आमचा यात काहीच सहभाग नसल्याचा युक्तिवाद तिघा डॉक्टरांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.

अर्बन बँकेत झालेल्या 22 कोटी 90 लाख रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. रवींद्र कवडे, डॉ. भास्कर सिनारे यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. दरम्यान तिघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी आरोपींच्यावतीने अ‍ॅड. विक्रमसिंह घोरपडे यांनी युक्तिवाद केला.

ते म्हणाले, एम्स हॉस्पिटलच्या मशिनरी खरेदीसाठी अर्बन बँकेतून तिघा डॉक्टरांच्या नावे कर्ज मंजूर झाले आहे, ही बाब त्यांना माहीतच नव्हती. 2016 मध्ये कर्जाच्या हप्त्याची नोटीस आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर डॉक्टरांनी अर्बन बँक, पोलीस अधीक्षक, तसेच रिझर्व्ह बँकेला पत्र देऊन हा अपहार असल्याचे कळविले होते.

तसेच या अपहारातील आरोपी डॉ. निलेश शेळके याने या सर्व कर्ज प्रक्रियेला मी जबाबदार असल्याचे 2018 मध्ये लिहून दिले होते. तरीही बँकेने आमच्या विरोधात फिर्याद दिली. दरम्यान न्यायालयाने तिघा डॉक्टरांना 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com