नगर अर्बनच्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप

28 तारखेला मतदान अन् 30 नोव्हेंबरला मतमोजणी
नगर अर्बनच्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर बँकेच्या चार जागा बिनविरोध झालेल्या असल्या तरी 14 जागांसाठी 21 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीतून बँक बचाव कृती समितीने माघार घेतल्यानंतरही सत्ताधारी सहकार मंडळा बँकेची निवडणूक बिनविरोध करता आलेली नाही. यामुळे येत्या 28 तारेखला बँकच्या 14 संचालकांच्या जागांसाठी मतदानाची प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा उपनिबंधक तथा अर्बन बँक निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत सोमवारी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. चिन्ह मिळाल्यानंतर आता बँकेच्या निवडणुकीचा प्रचार रंगणार आहे. 28 नाव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर 30 तारेखला नगरमध्ये मतमोजणी होवून 1 डिसेंबरला सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

मनपा हद्दील भिंगार छावणी मंडल सर्वसाधारण मतदारसंघ

अजय अमृतलाल बोरा (कपबशी), अनिल चंदूलाल कोठारी (कपबशी), अनिल पांडूरंग गटाणी (हॅट), ईश्वर अशोक उर्फ बाबूशेठ बोरा (कपबशी), गिरीष केदारनाथ लाहोटी (कपबशी), दिपक धनराज गुंदेचा (टेबल), दिप्ती सुवेंद्र गांधी (कपबशी), महेंद्र मोहिनीराज गंधे (कपबशी), राजेंद्रकुमार आत्माराम अग्रवाल (कपबशी), राहुल नरेंद्र जामगावकर (कपबशी), शैलेश सुरेश मुनोत (कपबशी), स्मिता महावीर पोखरणा (बॅट), संजय शिवाजी डापसे (गॅस टाकी), संपतलाल धनराज बोरा (कपबशी).

नगर शहर सोडून महाराष्ट्र राज्य सर्वसाधारण मतदारसंघ

कमलेश हस्तीमल गांधी (कपबशी), गणेश शामसुंदर राठी (किटली), अतुल राधावल्लभ कासट (कपबशी), अशोक माधवलाल कटारीया (कपबशी), रज्जाक निजाम इनामदार (कपाट), रमणलाल प्रेमराजजी भंडारी (जैन) (पतंग), सचिन मदनलाल देसर्डा (कपबशी) यांचा समावेश आहे.

झेडपी सोसायटी पाच अर्जाची विक्री

जिल्हा परिषदेच्या वर्तुळात कर्मचार्‍यांच्या अर्थकारणाचा कणा असणार्‍या जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारपासून इच्छुकांचे उमेदवारी नेण्यास आणि दाखल करण्याची मुदत सुरू झाली आहे. त्यानूसार पहिल्याच दिवशी तिघांनी पाच नेले असून अर्जाचा शुल्क 100 रुपये आहे. अर्ज नेलेल्यामध्ये चंद्रकांत वाकचौरे यांनी 2, संजय बनसोडे यांनी दोन तर श्रीकांत ढगे यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com