अर्बन बँक निवडणूक : माघारीसाठी उरले 36 तास

सोमवारी चिन्ह वाटप
अर्बन बँक निवडणूक : माघारीसाठी उरले 36 तास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाची आर्थिक संस्था आणि शंभर वर्षांहून अधिक परंपरा असणार्‍या नगर अर्बन बँकेच्या निवडणूक (Election of Nagar Urban Bank) माघारीच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी दोघांनी माघार घेतली. महापालिका (Municipal Corporation) व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड (Bhingar Cantonment Board) सर्वसाधारण मतदार संघातून काल अक्षय गोवर्धन बिहाणी, सुरेश रतनप्रसाद तिवारी यांनी माघार घेतली. माघारीसाठी शुक्रवार, 12 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.

अर्बन बँकेसाठी (Nagar Urban Bank) 90 उमेदवारांचे 111 अर्ज दाखल केले आहेत. यातील दोघांनी माघार घेतली आहे. बँकेच्या (Bank) 18 जागांसाठी ही निवडणूक (Election) होत आहे. निवडणुकीसाठी एकूण 94 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील चौघांचे अर्ज बाद झाले होते. आता 12 नोव्हेंबरला माघारीनंतर अंतिम उमदेवारी (Candidacy) जाहीर झाल्यानंतर 15 तारखेला चिन्हाचे वाटप झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी पेटणार आहे. दरम्यान, काही व्यक्तींकडून निवडणूक बिनविरोध (Election unopposed) करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरूवार आणि शुक्रवार दोन दिवस अर्ज माघारीसाठी राहिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com