‘अर्बन’ ला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावे

स्टाफ क्रेडीट सोसायटीच्या सभेत सीईओ साळवेंचे आव्हान
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँक ही अर्बन बँक स्टाफ क्रेडीट सोसायटीची मातृसंस्था आहे. बँक आहे तरच स्टाफ सोसायटीचे अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे आपल्या अर्बन बँकचा कारभार जर पुन्हा व्यवस्थित झाला तरच आपली क्रेडीट सोसायटीचेही काम पूर्ववत होणार आहे. म्हणून सर्व कर्मचार्‍यांनी अर्बन बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आव्हान नगर अर्बन बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी. साळवे यांनी केले.

नगर अर्बन बँक स्टाफ क्रेडीट सोसायटीची 2021-22 वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. साधक बाधक चर्चेने झालेल्या या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी बँकेच्या प्रभारी चेअरमन दीप्ती गांधी, संचालक अशोक कटारिया, अजय बोरा, महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

चेअरमन गांधी म्हणाल्या, नगर अर्बन स्टाफ सोसायटीला 56 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद बँकेच्या सर्व संचालक मंडळाला आहे. सोसायटी कर्मचार्‍यांना चांगल्या सुविधा देत आहे. सध्या आपल्या बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सर्व कर्मचार्‍यांनी मरगळ झटकून कर्ज वसुली करावी. या प्रतिकूल परिस्थितीत संचालक मंडळाला साथ द्या, असे आवाहन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com