नगर अर्बन बँक : 15 हजार कर्जदारांकडून 187 कोटींची वसुली

आठ महिन्यांतील कामगिरी
नगर अर्बन बँक
नगर अर्बन बँक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अर्बन बँकेवर (Nagar Urban Bank) 27 महिनेनंतर प्रशासक राज संपुष्टात येऊन नूतन संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर अवघ्या 4 दिवसातच रिझर्व बँकेने 35 (अ) अंतर्गत निर्बंध लादले. यामुळे बँकेचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प पडले. तरी ही या निर्णयाने खचून न जाता वाढलेला एनपीए (NPA) कमी करण्यासाठी संचालक मंडळाने थकीत कर्ज वसुलीची (Loan Recovery) मोहीम सुरु केली. गेल्या आठ महिन्यांत 187 कोटी रुपयांचे कर्ज 15 हजारांहून अधिक कर्जदारांकडून वसूल (Debtor Recovery) करण्यात आले.

यापैकी परफॉर्मिंग कर्ज खात्यात सुमारे 102 कोटी रुपये, नॉन परफॉर्मिंग कर्ज खात्यात सुमारे 78 कोटी, तसेच एक रकमी परतफेड योजने अंतर्गत सुमारे 7 कोटी रुपयांची कर्ज वसुली (Loan Recovery) करण्यात आली आहे. एक रकमी परतफेड योजनेअंतर्गत जमा सुमारे 7 कोटी रुपये हे 25 टक्क रक्कम असून रिझर्व्ह बँकेकडे (Reserve Bank) हे मंजुरीसाठी पाठवली आहे. त्यास मंजुरी मिळवून उर्वरित 75 टक्के म्हणजेच साधारणतः 21 कोटी हे मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच वसूल होणार आहेत. उर्वरित 400 कोटी रुपयांच्या थकीत वसुलीसाठीही बँकेने कंबर कसली आहे.

मोठ्या प्रमाणात 13 (2), 13 (4) तसेच सेक्यूटरायसेशन अ‍ॅक्टखाली नूतन संचालकांच्या संमतीने 200 हून अधिक कर्जदारांना नोटीशी देत काही कर्जदारांविरुद्ध गुन्हे ही दाखल करण्यात आलेले आहे. रिझर्व बँकेस लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये, या अनुषंगाने आलेल्या कारणे दाखवा नोटीशीलाही बँकेने समाधानकारक व पूरक उत्तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने मुद्देनिहाय माहिती देत संचालक ईश्वर बोरा, गिरीश लाहोटी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव साळवे, तसेच सनदी लेखापाल गौरव गुगळेेंच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी चेअरमन दीप्ती गांधी यांच्या स्वाक्षरीने दिले आहे.

बँकेचे भाग भांडवल वाढवण्याची देखील परवानगी अर्बन बँकेने (Nagar Urban Bank) रिझर्व बँकेकडे काही अटींना आधीन राहून केली आहे. बँकेचा कारभार पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी रिझर्व बँक सुद्धा सहकार्य करत आहे. या आर्थिक वर्षात बँक सर्व संकटे दूर होतील, अशी अपेक्षा सर्व संचालकांनी व कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. ज्या संचालकांनी राजीनामे दिले आहेत ते बोर्डाने स्वीकारलेले नाहीत. त्यांच्या सोबत ही सविस्तर बोलणी करून त्यांचे राजीनामे माघारी घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. बँकेच्या नूतन चेअरमनची ही लवकरच सर्वानुमते निवड होणार आहे.

डीआयजीसी योजनेसाठी (DIGC Scheme) अर्बन बँकेने (Nagar Urban Bank) 2011 पासून तत्कालीन चेअरमन स्व. दिलीप गांधी (Dilip Gandhi) व संचालक मंडळाने सर्वानुमते निर्णय घेत वेळोवेळी प्रीमियम भरल्याने ही विमा योजना त्यावेळेसपासून असल्याने या अडचणीच्या काळात बँकेस विमा योजना लागू झाली आहे. या विमा योजने अंतर्गत आजपर्यंत साधारणतः 2 लाखांहून अधिक ठेवीदारांच्या 300 कोटींहून अधिकच्या ठेवी ठेवीदारांना दोन टप्प्यात परत मिळाल्या आहेत. लवकरच डीआयजीसी (DIGC Scheme) अंतर्गत विविध ठेवीदारांनी तिसर्‍या टप्प्यात भरलेले क्लेम देखील पूर्ण होऊन त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या इतर बँकेतील खात्यात जमा होणार असल्याचे संचालक बोरा यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com