अहमदनगर (प्रतिनिधी) -

शतकोत्तरी वाटचाल करणार्या नगर अर्बन बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात अर्धा टक्का कपात केली आहे. मासिक हप्ता कमी

होण्यासोबतच हजारो कर्जदारांना या निर्णयामुळे करोना काळात आधार मिळाला आहे. गत वर्षभरात बँकेने व्याजदरात तब्बल अडीच टक्के कपात केली.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नगर अर्बन बँकेने पुन्हा एकदा व्याजदरात अर्धा टक्के कपातीची घोषणा मंगळवारी केली. 1 जानेवारी 2020 मध्ये बँकेने एक टक्का आणि त्यानंतर 1 जुलै 2020 मध्ये पुन्हा 50 टक्के तसेच नियमीत कर्ज फेडणार्यांना अर्धा टक्के रिबेट दरात वाढ केली होती. आता 15 मार्चपासून पुन्हा एकदा अर्धा टक्के व्याजदर कमी करण्यात आले.

जिल्ह्यताल सर्वात मोठ्या मल्टिस्टेट शेड्युल्ड सहकारी बँक असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेने जागतिक करोनाच्या संकटाच्या पार्श्ववभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये ग्राहकांना आर्थिक आधार देण्यासाठी व्याजदरात ही कपात केली आहे.

रिझर्व बँक ऑफ इंडियाने अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मार्च महिन्यामध्ये रेपो रेट 0.75 टक्के व मे 2020 मध्ये 0.40 टक्के कपात केलेली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर करताना बँकांनी शक्य तितक्या लवकर कर्ज व्याजदर कमी करावेत असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत नगर अर्बन बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर जानेवारी 2020 ते मार्च 2021 पर्यंत साधारण 2.50 टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे ईएमआयचे टेन्शन असणार्या कर्जदारांना या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दिलासा मिळणार आहे.

111 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेवर सभासद, ठेवीदारांनी, कर्जदारांनी दाखवलेला विश्वास आणखीन वृद्धिंगत करत नवीन ठेवी बँकेमध्ये ठेवून वरील योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश शिंगटे, व्यवस्थापकीय समितीने केले आहे.

आता पाच लाखापर्यंतच्या ठेवींना विमा

1 ते 10 वर्षाचे कालावधीसाठी अखंड ठेव योजना कार्यान्वित करण्यात आलेली असून निर्धारित व्याजदरापेक्षा 0.15 ते 0.25 टक्के अधिक व्याजदर या ठेवींवर देण्यात येत आहे. याबरोबरच एक लाखापर्यंत ठेवींसाठी असलेले विमा संरक्षण आता पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच आयकर भरणार्या बँकेच्या सर्व ग्राहक व सभासद व ठेवीदारांना बँकेचे टॅक्स सेव्हिंग सर्टिफिकेट ठेव योजनेत गुंतवणूक करून आयकरांमध्ये सवलत मिळवता येणार आहे.