नगर : जिल्ह्यात आज ३६१ रुग्ण करोनामुक्त

आज त्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला
नगर : जिल्ह्यात आज ३६१ रुग्ण करोनामुक्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात आज तब्बल ३६१ रुग्ण करोना मुक्त झाले आहे. आज त्या रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आजपर्यंत ४३ हजार ८५८ रूग्ण करोनामुक्त झाले आहे.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ६०, अकोले ११, जामखेड २७, कर्जत २३, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ४६, नेवासा ०५, पारनेर १०, पाथर्डी २२, राहाता २६, राहुरी ४३, संगमनेर ३५, शेवगाव २२, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०३ मिलिटरी हॉस्पिटल १३ रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com