नगर तालुक्यातील तीन गावांत 18 डिसेंबरला आठवडे बाजार बंद

नगर तालुक्यातील तीन गावांत 18 डिसेंबरला आठवडे बाजार बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नगर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर, 2022 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून मतदान व आठवडे बाजार एकाच दिवशी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उप विभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी मार्केट अँड फेअर अ‍ॅक्ट 1862 थे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करून नगर तालुक्यातील जखणगाव, सारोळा कासार व सोनेवाडी चास, येथील 18 डिसेंबर, 2022 रोजीचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com