नगर तालुका महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

अरेरावी करणार्‍या कोके, एकाडे यांना अटक करण्याची केली मागणी
नगर तालुका महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तहसीलदारांच्या (Tahsildar) उपस्थितीत तलाठी (Talathi) व मंडल अधिकारी (Divisional Officer) यांच्या मासिक बैठकीत शाम कोके व सचिन एकाडे यांनी जावून हुज्जत घालून आरडाओरडा अपशब्द वापल्याप्रकरणी कोके आणि एकाडे यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल आहे. या दोघांना अटक होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय तलाठी, मंडल अधिकारी व महसूल कर्मचार्‍यांनी घेतला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी (Collector) यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेलेकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती (State Government Employees) संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, उपाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, राजेंद्र बकरे, एस. एस. जगताप, दिलीप जायभाय, जे. जी. धसाळ, ए. एन, अमोल, जी. डी. जाधव, एस. एस.जेठे, एस. ई. भापकर, आर. बी. कोळेकर, आर. बी. गोरे, ए. एस. खरपुडे, व्ही. बी. नाईक आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी (Collector) यांना दिलेल्या निवेदनात कोके आणि एकाडे यांनी वापरलेली भाषा ही अत्यंत गलिच्छ आहे.

यामुळे आरोपींना जोपर्यंत अटक (Arrested) होऊन त्यांच्यावर कारवाई (Action) होत नाही, तोपर्यंत नगर तालुक्यातील (Nagar Taluka) महसूल कर्मचारी (Revenue Staff), तलाठी व मंडल अधिकारी अत्यावश्यक सेवा व निवडणुक कामकाज वगळता अन्य कामावर बहिष्कार टाकत काम बंद आंदोलन करत आहेत. विचित्र वृत्तीच्या लोकांना धडा शिकविणे अत्यावश्यक असून अशी प्रवृत्ती दिवसेंदिवस प्रत्येक तालुक्यातमध्ये बळावल्याचे दिसून येत आहे. यामधून शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मनोधैर्य खच्चीकरण होऊन ते जोमाने काम न करताकेवळ नैराश्य भूमिकेतून काम करत असल्याचे वेळोवळी निदर्शनास आलेले आहे. अशा घटनांना आळा बसण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित व्यक्तींना अटक व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना द्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com