नगर तालुक्यात बिबट्याचा वावर

 नगर तालुक्यात बिबट्याचा वावर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तालुक्यातील सारोळा कासार परिसरात मंगळवारी रात्री बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाच्या पथकाने या परिसरात केलेल्या पाहणीत बिबट्याच्या पायाचे ठसे शेतात आढळून आले असून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सारोळा कासार गावाजवळ बाळासाहेब लिंभोरे हे आपल्या कुटुंबियांसह कारमधून जात असताना त्यांच्या कारला बिबट्या आडवा गेल्याचे त्यांना दिसले. त्यांनी ही बाब काही नागरिकांना सांगितली. याबाबत नगर विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांनाही कळविण्यात आले. त्यांनी वनविभागाचे पथक बुधवारी सकाळी सारोळा कासारमध्ये पाठवले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com