नगर तालुक्यात 84 टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
नगर तालुक्यात 84 टक्के मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी रविवारी दिवसभर शांततेत 84 टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळपासून मतदारांच्या रांगा मतदान केंद्रा बाहेर दिसत होत्या.

नगर तालुक्यात 26 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा मोठ्या प्रमाणात होत्या. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. दुपारी काही प्रमाणात मतदारांची गर्दी कमी होती.

वाळकी, सारोळा कासार येथे उशीरापर्यंत मतदान सुरू होते. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. मतदारांना घेऊन येताना उमेदवारांची चांगलीच लगबग चालू होती. मतदान केंद्राबाहेर उमेदवार सकाळपासूनच हात जोडून उभे होते. मंगळवारी तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी होणार आहे.

झालेल्या मतदानाची टक्केवारी

उक्कडगाव 90 टक्के, खातगाव 81 टक्के, सोनेवाडी 85 टक्के, आठवड 90 टक्के, सारोळा बध्दी 85 टक्के, नेप्ती 85 टक्के, कापुरवाडी 86 टक्के, बाबुर्डी 94 टक्के, साकत 91 टक्के, टाकळी खातगाव 86 टक्के, जखणगाव 83 टक्के, नांदगाव 75 टक्के, शेंडी 85 टक्के, सारोळा कासार 87 टक्के, पांगरमल 80 टक्के, पिंपळगाव कौडा 80 टक्के, आठवड 87 टक्के, मदडगाव 83 टक्के, नारायण डोह 82 टक्के, कौडगावजांब 85 टक्के, सोनेवाडी पिला 90 टक्के, रांजणी 90 टक्के, आगडगाव 86 टक्के, दहीगाव 87 टक्के, वाळकी 82 टक्के, राळेगण म्हसोबा 91 टक्के, वडगाव तांदळी 83 टक्के असे आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com