नगर तालुका सहकारी दूध संघाचे नऊ सदस्य राष्ट्रवादीत

चेअरमनच्या मनमानीपणाला कंटाळ्याचा आरोप
नगर तालुका सहकारी दूध संघाचे नऊ सदस्य राष्ट्रवादीत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका सहकारी दुध व्यवसाय व प्रक्रिया संघाच्या नऊ संचालकांनी चेअरमनच्या मनमानी कारभाराला कंटाळून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

दुध संघाची देऊळगाव सिध्दी येथे वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पाडली. या सभेमध्ये संघाच्या नऊ संचालकांनी राष्ट्रवादी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी रोहीदास कर्डीले, केशव बेरड, गोरख सुपेकर, किसन लोटके यांनी पुढाकार घेतला. प्रवेश केलेले संचालकांमध्ये मोहन तवले, भाऊसाहेब काळे, गोरक्षनाथ काळे, बजरंग, पाडळकर, रामदास शेळके, पुष्ण कोठुळे, वैषाली मते, राजाराम धामणे, स्वप्नील बुलाखे यांचा समावेश आहे.

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रताप ठाकणे, घनश्याम शेलार, गेंविद मोकाटे, शरद पवार, प्रकाश पोटे, गोरख सुपेकर, गुलाब काळे, निखील शेलार, गजानन खरपुडे, दत्तात्रय डोकडे उपस्थित होते. संघाचे चेअरमन यांच्या मनमानी कारभाराला कटांळून आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दहा वर्षापासून दुध संघाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून ना. तनपुरे, आ. लंके, शेलार यांच्यामुळे तालुक्यात दुध संघ पुन्हा उदयास येणार असून यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे भाऊसाहेब काळे यांनी सांगीतले.मधुकर मगर, गुलाब कार्ले या संचालकांनी राजीनामे दिलेले आहेत.

Related Stories

No stories found.