नगर तालुका सहकारी दूध संघ कर्मचार्‍यांचे उपोषण

विविध मागण्यांसाठी 273 कर्मचार्‍यांचा सहभाग
नगर तालुका सहकारी दूध संघ कर्मचार्‍यांचे उपोषण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या 273 कर्मचार्‍यांनी विविध मागण्यासंदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूजल सर्वेक्षण कार्यालय आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे.

सर्व कर्मचार्‍यांची सेवा पूर्ववत कायम करावी तसेच उपदान प्रॉव्हिडंट फंड मिळावा, कामबंद संघ भरपाई द्यावी, संघाच्या जागा विक्रीच्या शिल्लक निधीतून कर्मचार्‍यांची देणी थेट कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करावी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसून तातडीने दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाची नोटीस जारी झाली असल्याने प्रॉव्हिडंट फंडचा भरणा तात्काळ करावा, संघास कर्मचार्‍यांनी सहकार्य केल्यामुळे पुनर्जीवन झाले आहे,

म्हणून वयपरत्वे पुढील सेवेचा उपदान प्रायव्हेट फंड काम बंद संघ भरपाई आधी लाभ मिळण्यास पात्र असल्याने कार्यवाही करावी, संघास आवश्यक असलेले पटावरील अनुभवी सेवकांची नेमणूक करून कामाची संधी देण्यात यावी अशा मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या मागण्या तातडीने मान्य न केल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचार्‍यांनी दिला आहे.

तायगा शिंदे, गजानन खरपुडे, कुंडलिक देवकर, एकनाथ कोतकर, किरण थोरात, भाऊ चितळकर, अरुण वाकळे, आप्पासाहेब ढवळे, रमेश वायकर, रावसाहेब तांबे, संभाजी निमसे, दत्तात्रेय पानसंबळ, एकनाथ कराळे, बाबा चतुर आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com