नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक

नाशिकच्या मल्लास चितपट || सव्वा तास रंगली शेवटची कुस्ती
नगरच्या सुदर्शन कोतकरने पटकावला उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक

अहमदनगर/पारनेर |प्रतिनिधी| Ahmednagar

पाथर्डीत तालुक्यात रंगलेल्या उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेत नगर मधील सुदर्शन कोतकर याने अंतिम विजेतेपद पटकाविले. अंतिम कुस्तीची लढत सुदर्शन कोतकर (नगर) विरुध्द बाळू बोडखे (नाशिक) यांच्यात लाल मातीच्या आखाड्यात झाली. सव्वा तास चाललेल्या कुस्ती स्पर्धेत कोतकर याने घुटना डावावर बोडखे याला चितपट केले. तर या कुस्ती स्पर्धेत नगरच्या मल्लांनी मैदान गाजवले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने नगर जिल्हा तालीम संघ, संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे व श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एम. निर्‍हाळी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कुस्त्यांचा थरार रंगला होता. सकाळ ते संध्याकाळपर्यंत सहा गटात कुस्त्या रंगल्या होत्या. सर्व कुस्त्या मॅटवर घेण्यात आल्या. शेवटची उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेची कुस्ती लाल मातीत बेमुदत निकाली लावण्यात आली होती. यामधील विजयी मल्लास स्पर्धेचे आयोजक अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या हस्ते चांदीची गदा व 51 हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. तर उपविजयी मल्ल बाळू बोडखे याला 31 हजार रुपये व चषक तर तृतीय विजेता अनिल ब्राम्हणे याला 21 हजार रोख व चषक देण्यात आले.

यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पै. राजेंद्र शिरसाठ, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, मोहन हिरणवाले, ऋषीकेश ढाकणे, अ‍ॅड. सिध्देश ढाकणे, माजी सभापती काशीनाथ लवांडे, पाथर्डी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, रफिक शेख, सिताराम बोरुडे, नगरसेवक बंडू बोरुडे, डॉ. दिपक देशमुख, लक्ष्मणराव डोंमकावळे, हाजी हुमायुम अत्तार, प्रा. गाडे, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. राजेंद्र खेडकर, सतीश मुनोत, कपील अग्रवाल, सुनिल भिंगारे, महादेव आव्हाड, नाशिक जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बळकवडे, डॉ. शिवाजी खेडकर, संग्राम शेळके, योगेश रासने, नगरसेवक सुभाष लोंढे, हर्षवर्धन कोतकर, शिवाजी चौधरी, हिरामन वाघ, युवराज पटारे, शांताराम बागुल, गहिनीनाथ शिरसाठ, देवा पवार, बाळासाहेब घुले, विक्रम बारवकर, शिवाजी बडे, रफिक शेख, दिगंबर गाडे, दिगंबर ढवण आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com