नगर दक्षिणेत महाविकास आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

नगर दक्षिणेत महाविकास आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नगर दक्षिणेत संमिश्र प्रतिसाद मिळाला. दक्षिणेतील काही तालुक्यांत महाविकास आघाडीच्या नेते आणि आणि कार्यकर्त्यांनी बंद पाळला. तर काही ठिकाणी बंदला संमिश्र तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलने झाली. यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीगोंद्यात सकाळी बंद तर दुपारनंतर व्यवहार सुरळीत झाले.

शेवगाव तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांत प्रतिसाद

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनास शेवगाव शहर व तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांत जोरदार प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनासह महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सकाळी बाजारपेठेत येऊन व्यापार्‍यांना बंदचे आवाहन केले. त्यानंतर शहरातील बस स्थानकानजीकच्या क्रांती चौकात झालेल्या सभेत जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे, ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड.अनिल मडके, माजी सभापती अरुण लांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, संजय फडके, संतोष जाधव, समीर शेख, वहाब शेख, कमलेश लांडगे, मन्सूर फारुकी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.अमोल फडके, माजी सभापती प्रकाश भोसले, सुधीर बाबर, प्रकाश तुजारे, शिवसेना तालुका प्रमुख अ‍ॅड. अविनाश मगरे, शीतल पुरनाळे, जि.प.सदस्य रामजी साळवे, एकनाथ कुसळकर, भारत लोहकरे, ज्ञानेश्वर आदमाने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, कॉ.संजय नांगरे, संजय लहासे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जामखेडला रास्तारोको आंदोलन

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड शहरात सकाळी 11 वाजता महाविकासआघाडीने खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करून उत्तर प्रदेशातील लखमीपूर येथील घटनेचा निषेध केला. शहरासह ग्रामीण भागातील काही गावांमध्ये बंद पाळण्यात आला. बंद काळात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. शहीद झालेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजली वाहून आरोपींना अटक व्हावी व संबंधित केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा या मागणीचे व निषेधाचे निवेदन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले. यावेळी मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सुनिल कोठारी, राजेंद्र पवार, इस्माईल सय्यद, शहाजीराजे भोसले, जयसिंग उगले, वैजनाथ पोले, पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, राजेंद्र गोरे, सरपंच बापू कार्ले, नागेश कात्रजकर, प्रकाश काळे, उमर कुरेशी, अमित जाधव, राहुल उगले, राहुल आहिरे, प्रवीण उगले, महेंद्र राळेभात, महेश राळेभात, सचिन शिंदे, रोहन पवार,जमीर बारुद, जुबेर शेख, हरिभाऊ आजबे, समीर चंदन, सुनील जगताप, काकासाहेब कोल्हे, देवीदास भादलकर, शिवराजे घुमरे, सुनील शिंदे, अनिकेत जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाथर्डीत संमिश्र प्रतिसाद

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

महाविकास आघाडीच्यावतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाथर्डी शहर व तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पाथर्डी शहरात या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. शहरातून केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. स्व.वसंतराव नाईक चौकात निषेध सभा घेण्यात आली. आंदोलनात राजेंद्र दळवी, शिवशंकर राजळे, नासिर शेख, भगवान दराडे, अंकुश चितळे, बंडू बोरूडे, सिताराम बोरुडे, योगेश रासने, ऋषीकेश ढाकणे, सविता भापकर, काँग्रेसचे महेश दौंड, आदिनाथ देवढे, दादासाहेब खेडकर, हुमायून आतार, रफिक शेख, सागर राठोड, सचिन नागापुरे, भाऊसाहेब धस,मंगल म्हस्के आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार शाम वाडकर यांनी निवेदन स्वीकारले.

पारनेर तालुक्यात अल्प प्रतिसाद

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला पारनेर तालुक्यात अल्प प्रतिसाद मिळाला. सकाळी अकरा वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व व्यव्हार सुरळीत होते. पारनेरसह, सुपा, निघोज, टाकळीढोकेश्वर या मोठ्या बाजारपेठेतील व्यव्हार सुरू होते. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत होती. करोनाने जनजीवन विस्कळीत झाले असल्याने बंदमुळे उपासमारीची वेळ येईल असे नागरिक सांगत होते. सुपा येथे काही शेतकर्‍यांनी भावना व्यक्त करताना अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले, त्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले नाही आणि आता राजकीय पोळी भाजण्यासाठी बंदचे आवाहन करत सर्व व्यवहार बंद ठेवणे चुकीचे आहे.

कर्जतमध्ये संमिश्र प्रतिसाद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

महाविकास आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.याठिकाणी मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्जत शहरात सकाळपासूनच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. कोपर्डी येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. येथील सर्व दुकाने बंद होती. कुळधरणमध्ये बंदला प्रतिसाद नाही. येथील सर्व बाजारपेठा सुरळीत सुरू आहेत. राशीन येथे बंदला प्रतिसाद मिळाला नाही. येथील सर्व बाजारपेठा व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. ठराविक दुकाने बंद होती. तालुक्यात बंदला एकूण संमिश्र प्रतिसाद मिळाला.

Related Stories

No stories found.