नगर - सोलापूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 50 कोटी : विखे

श्रीगोंदा तालुक्यातील जमिनीचे भूसंपादन पोटी मोबदला
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

नगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र. 516 च्या चौपदरीकरणाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात करण्यात आलेल्या

भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून 50 कोटी रुपयांचा पहीला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात भूसंपादन अधिकारी यांनी वर्ग केला असल्याची माहीती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

जिल्ह्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नगर ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 516च्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. प्रांताधिकार्‍यांनी मंजूर केलेल्या निवाड्याप्रमाणे भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे प्रस्ताव हा करण्यात आले होते.

या प्रस्तावांना मंजुरी देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने भूसंपादनापोटी 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी मंजूर झाला असल्याचे खा. विखे पाटील यांनी सांगितले.

या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बनप्रिंप्री तरडगाव मांडवगण व घोगरगाव या गावांतील जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याचे असे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी. बी. दिवाण यांनी सांगितले.

जमिनी गेलेल्या शेतकर्‍यांना मोबदला मिळावा म्हणून खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रशासकीयस्तरावर सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला. यापूर्वी कर्जत तालुक्यातील भूसंपादनासाठी 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता म्हणून वर्ग करण्यात आला होता. आता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांना पहिला हप्ता म्हणून 50 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे विखे पाटील स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com