नगर : वैदूवाडी परिसर प्रतिबंधित क्षेत्र
सार्वमत

नगर : वैदूवाडी परिसर प्रतिबंधित क्षेत्र

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

सावेडीतील वैदूवाडी भाग महापालिका प्रशासनाने 20 ऑगस्टपर्यंत सील केला आहे. करोना उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात महिला आणि पुरूषाचा समावेश आहे, यामुळे वैदूवाडीसह आजूबाजूच्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने ही कार्यवाही केली आहे. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आदेश काढून हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.

प्रतिबंधित क्षेत्र म्हणून वैदूवाडी रोड, शुभंकरोती बंगला, प्रियदर्शनी कॉलनी, विजय आर्ट, धनंजय कार केअर, लगड यांचे घर, अंबिका स्टील, गुरूकृपाधाम कमान, रेवती नर्सिंग होम, हॉटेल रामा कॉर्नर ते शुभंकरोती बंगला हा परिसर असणार आहे.

तर, बफर क्षेत्र म्हणून सिद्धीविनायक कॉलनी, गणेश कॉलनी, तुळजा भवानी मंदिर, पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौक, लोकमान्यनगर, बालाजी कमान परिसर, श्रेयस कॉलनी, कुष्ठधाम रोड, गुरूकृपा कॉलनी, वैभव कॉलनी व रेणावीकर शाळा परिसर राहील.

वैदूवाडी परिसरात अत्यावश्यक सेवा महापालिका प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहे. परिसरात रहदारीसाठी आणि जीवनाश्यक सेवा पुरविण्यासाठी शुभंकरोती बंगला समोरील वैदूवाडी रोड खुला राहील. या परिसरातील नागरिकांनी करोना साथसाखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com