
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भरधाव कार डिव्हायडरला धडकून ट्रकवर जावून आदळली. या भीषण अपघातात (Car Truck Accident) कारमधील दोघांचा मृत्यू (Death) झाला आहे. नारायण खंडू पडघण (वय 26 रा. पिंपळगाव रोठा ता. पारनेर), अजिनाथ रमेश साळुंके (वय 21 रा. धानोरा ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मयत व्यक्तींचे नाव आहेत.
मंगळवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास नगर-पुणे रोडवरील (Ahmednagar Pune Road) चास (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी गुरूवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. रामचंद्र भाऊराव पालवे (वय 39 रा. पालवेवाडी ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. हुंडाई कंपनीची आय- 20 कारवरील चालक नारायण खंडू पडघण याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून चास शिवारात डिव्हायडरला धडक दिली.
धडक ऐवढी भीषण होती की कार हवेत उडून डावे बाजूच्या लेनवरून जाणार्या फिर्यादीच्या ट्रकवर जावून आदळली. या अपघातात (Accident) कार चालक पडघण यांच्यासह कारमधील अजिनाथ साळुंके यांच्या मृत्यू (Death) झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.