नगर-पुणे महामार्गावर लहुजी शक्ती सेनेचा रास्ता रोको

चोर समजून मातंग समाजातील युवकाच्या झालेल्या हत्येचा निषेध
नगर-पुणे महामार्गावर लहुजी शक्ती सेनेचा रास्ता रोको

बेलवंडी |प्रतिनिधी| Belwandi

औरंगाबाद जिल्ह्यात चोर समजून पकडलेल्या मातंग समाजातील युवकाचे हातपाय बांधून त्याला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना घडली आहे. याचा निषेध नोंदवत लहुजी शक्ती सेनेचच्यावतीने अहमदनगर -पुणे महामार्ग शिरूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आज दुपारी भर उन्हात डांबरी रस्त्यावरती लोटांगण घेत, प्रशासनाच्या नावाने बोंबा मारत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लहुजी शक्ती सेना कोअर कमिटी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.हेमंत खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले, प्रामुख्याने आंदोलनामध्ये शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील लहुजी शक्ती सेना मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तत्पूर्वी लहुजी शक्ती सेनेच्यावतीने अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच शिरूर श्रीगोंदा येथील तहसीलदार, पोलीस प्रशासन यांना रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते.

20 एप्रिल रोजी मनेश आव्हाड (वय 27) या मातंग समाजाच्या तरुणावर औरंगाबाद येथे चोरीच्या संशयावरून हल्ला करून हात-पाय बांधून निर्दयपणे लाकडी दांडक्याच्या जबर मारहाणीने खून करण्यात आला. याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर दहशत निर्माण करण्यासाठी पाठवला होता, या घटनेतील मोाकाट सर्व आरोपींना त्वरीत अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी या प्रकरणाने सर्व समाजाच्या भावना तीव्र असून, आव्हाड कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, संशयितांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याची प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी मातोश्री वरती लहुजी शक्ती सेना व मातंग समाज घेराव घालणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले,

यावेळी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.हेमंत खंदारे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे, कार्याध्यक्ष राजाराम काळे,जिल्हा संघटक लखन साळवे, प्रवीण कुमार शेंडगे, प्रकाश साळवे, वसंत औचिते,आप्पा रोकडे,अनिकेत शेंडगे,राजू मोटे,नंदूभाऊ ससाणे,विशाल जोगदंड,नगरसेवक दादाभाऊ लोखंडे,लहुजी शक्ती सेना अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन लोखंडे, प्रफुल्ल आडगळे,संतोष शेंडगे, नानु भवाळ,पप्पु शेंडगे,सचिन काळोखे,तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना महिला आघाडीच्या मोनिका जाधव, शहराध्यक्ष संध्या जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष फुलाबाई थोरात, बबई नाडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.