नगर-पुणे महामार्गावर डिझेल, स्टिल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

सुपा पोलीसांची धडक कारवाई
नगर-पुणे महामार्गावर डिझेल, स्टिल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहमदनगर-पुणे महामार्गावरून जाणार्या डिझेल टँकर तसेच स्टिल वाहतूक करणार्या ट्रकमधून चालकांच्या संगनमताने डिझेल व स्टिलची चोरी करणार्या टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 1 लाख 9 हजार 670रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-पुणे महामार्गावर डिझेल, स्टिल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
रस्त्यांच्या गुणवत्तेवरून मनपा टांगली वेशीला

दत्तात्रय कळमकर (रा.पळवे बुद्रुक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरून जाणार्‍या वाहनांमधून डिझेल, गॅस, स्टिल किंवा इतर वस्तू चालकांच्या संगनमताने चोरी करणारी रॅकेट विशेषतः सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्यरत आहेत. सुपे पोलिसांचे नियंत्रण नसल्याने नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या पथकाने दोनदा कारवाई करून ही रॅकेट उध्वस्त करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते.

नगर-पुणे महामार्गावर डिझेल, स्टिल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
आठ दिवसांत मिळणार राष्ट्रवादीला नवीन जिल्हाध्यक्षा

तरीही ही तस्करी सुरूच असल्याने सुपे पोलिसांनी सतर्क होत अहमदनगर पुणे महामार्गावर पळवे बुद्रुक शिवारातील हॉटेल प्रविणच्या मोकळया जागेत सुरू असलेला हे रॅकेट उध्वस्त केले. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तेथे प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये भरलेले डिझेल, रबरी नळी, नारंगी रंगाची नळी, इलेक्ट्रिक कटर, स्टिल कट करण्याचे कटर, प्लॅस्टिकचे नरसाळे, लोखंडी सळयांचे बंडल असा 1 लाख 9 हजार 670 रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दत्तात्रय कळमकर रा. पळवे बुद्रुक याच्यावर चोरी, जीवनावश्यक वस्तूं अधिनियमासह इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नगर-पुणे महामार्गावर डिझेल, स्टिल चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश
दिवाळीत यंदा खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार!

असा चाले प्रकार

वाहन चालक कंपनीत स्टील भरताना शिताफिने स्टेपनी तसेच इतर काही वजनांद्वारे स्टीलच्या वजनाबाबत कंपनीच्या डोळ्यात धुळफेक करतात. त्या वजनाचे स्टील तसेच त्याच पद्धीतने टँकर चालक शिताफीने काही लिटर डिझेल मारतात. तर अनेक वाहन चालक वाहनाच्या टाकीतील डिझेल विकतात. ते संगनमनत करून वाहन प्रविण हॉटेलच्या मागे नेण्यात येऊन टँकरमधील ज्वलनशील डिझेल, ट्रकमधील स्टिल काढण्यात येऊन त्याची अवैधरित्या विक्री करण्यात येत होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com