नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

1 जानेवारी 2022 रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त 31 जानेवारी सायंकाळी सात वाजल्यापासून 1 जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत पुणे अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी हा आदेश काढला आहे. याशिवाय अभिवादनासाठी येणार्‍या नागरिकांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे- नगर महामार्गावरील वाहतूक 29 तासांसाठी वळविण्यात येणार आहे.

नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल
वाळूमाफीयांच्या उच्छादाला सरकारचे पाठबळ

अशी असेल वाहतूक-

1) पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहतूक खराडी बायपास मार्गे केडगाव - चौफुली - न्हवरा - शिरूर मार्गे नगरकडे वळविण्यात येणार आहे.

2) सोलापूरहून चाकण कडे जाणारी वाहतूक खराडी बायपास मार्ग विश्रांतवाडी - आळंदी - चाकण मार्गे वळविण्यात येणार आहे.

3) मुंबईहून नगरकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ - चाकण - खेड - मंचर - नारायणगाव आळेफाटा - नगर

4) मुंबई हून नगरकडे जाणारी जड वाहने चाकण - खेड - पाबळ - शिरूर मार्गे नगर येथे वळविण्यात येणार आहे.

नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल
जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

अभिवादन कार्यक्रमासाठी येणार्‍या नागरिकांना विविध ठिकाणी वाहनानुसार पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पार्किंग स्थळापासून विजयस्तंभ पी एम टी बस ची सोय करण्यात आली आहे.

नगर-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल
शिर्डीत बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com