कार उलटून अपघात; दोघांचा मृत्यू

कार उलटून अपघात; दोघांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) घाटातील वळणावर भरधाव वेगातील कार उलटून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघे जण जागीच ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अजित दीपचंद पटेल (वय 24), विकास रामनारायण विश्वकर्मा (वय 21, दोघे रा. जय्यतपूर, मध्यप्रदेश, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे युवक मयत झाले आहेत.

तर रामनारायण श्रीबालमुकुंद मेहेरा (वय 26, रा. शिरूर) व मुकेश गोरख पाटील (वय 28, रा. कासौदा, जि. जळगाव, हल्ली रा. कारेगाव, ता. शिरूर) हे दोघे जखमी झाले आहेत. मयत व जखमी हे चौघे एकमेकांचे मित्र असून ते कामानिमित्त कारेगाव व शिरूर येथे राहत होते. मंगळवारी पहाटे ते त्यांचा मित्र आनंदा नाईक (रा. चाकण, ता. खेड) याची कार घेऊन कारेगाव येथून शिर्डीकडे दर्शनासाठी चालले होते.

पहाटे 2 च्या सुमारास त्यांची कार चास जवळील घाटात आल्यावर वळणावर भरधाव वेगातील कारवरील चालक मयत अजित पटेल याचे नियंत्रण सुटले व कार पलटी झाली. या भीषण अपघातात दोघाजणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com