पुलावरील कठडा तोडून कार खाली कोसळली; पाच जखमी

पुलावरील कठडा तोडून कार खाली कोसळली; पाच जखमी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-पुणे महामार्गावर रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कामरगाव (ता. नगर) शिवारात स्माईल स्टोन हॉटेल जवळ भरधाव वेगातील कार पुलावरील कठडा तोडून खाली कोसळली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्या सर्वांवर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातात जखमी झालेले कुटुंब मुळचे अमरावती येथील राहणारे आणि नोकरीनिमित्त पुणे येथे स्थानिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांची नावे समजू शकली नाही. हे कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे जात होते. सकाळी 6 च्या सुमारास कामरगाव शिवारात स्माईल स्टोन हॉटेल जवळ असलेल्या वळणावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकली. त्यात पुलाचा कठडा तुटला व कार पुलावरून खाली 20 ते 25 फुट कोसळली. सुदैवाने पुला खाली झाडे झुडुपे असल्याने कार त्यांना अडकत खाली जावून आदळली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com