नगर, पाथर्डी, राहुरी तालुक्यातील पाणी दुषित

12 गावात निकृष्ट ब्लिचिंग पावडर
नगर, पाथर्डी, राहुरी तालुक्यातील पाणी दुषित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ग्रामीण भागातील जनतेला शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी सरकार पातळीवरून प्रयत्न होवून देखील केवळ ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात पिण्याचे पाणी दुषित असल्याचे समोर येत आहे. डिसेंबर महिन्यांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पाणी नमुने तपासणीत जिल्ह्यात नगर तालुक्यातील 21 गावातील, पाथर्डी तालुक्यातील 12 आणि राहुरी तालुक्यातील 8 गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने दुषित आढळले आहेत.

ग्रामीण भागातील जनतेला पुरवठा होणार्‍या पाण्याचे नमुने दर महिन्यांला तपासण्यासाठी गाव पातळीवर जलसुरक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे जलसुरक्षक नियमतिपणे पाण्याच्या नमुने घेवून प्रत्येक तालुक्याला असणार्‍या भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोग शाळेसह पब्लिक हेल्थ लॅबकडे तपाणीसाठी जमा करतात. त्यानंतर येणार्‍या तपासणी अहवालाची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सादर करण्यात येतो. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, त्या पाण्याचा स्त्रोत दुषित होवू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येतात.तसेच पाणी शुध्दीकरणासाठी नियमित ब्लिचिंग पावडचा वापर करत पाण्यात 20 टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन असल्यास ते पिण्यास योग्य नाही, असे कळवण्यात येते.

दुषित पाणी असणारी गावे

डिसेंबर महिन्यात नगर- वाकोडी, आगडगाव, पिंपळगाव लांडगा, बाराबाभळी, अकोळनेर, हिवरेबाजार, पिंपळगाव वाघा, निमागाव घाणा, गुंडेगाव, जखणगाव, हमीदपूर, पिंपळगाव माळवी, खोसपुरी, उदरमल, आव्हाडवाडी, कामरगाव, भोयरे पठार, चास, डोंगरगण, इमामपूर, बहिरवाडी. अकोले- रुंभोडी. पारनेर- वाळवणे, खडकवाडी. पाथर्डी- अगसखंड, येळी, मिडसांगवी, दुलेचांदेगाव, देवरी, राघु हिवरे, भिलवडे, अल्हानवाडी, मांडवे, चिंचपूर पांगुळ, गितेवाडी, बोरसे वाडी, सोमठाणे नलावडे. शेवगाव- वडुले खु, बेलगाव, प्रभू वडगाव, येरंडगाव समासुद, भातकुडगाव. राहाता- जळगाव. राहुरी- गांणगापूर, संक्रापूर, चांदेगाव, बारागाव नांदूर, सडे, पिंपरी अवघड, राहुरी खु, गोटूंबे आखाडा. संगमनेर- पि. कोणझीरा, जवळे बाभळेश्वर, अकलापूर, समनापूर. श्रीगोंदा- खांडगाव, पिसोरेखांड, वलघुड. श्रीरामपूर- एकलहरे येथील पाणी नमुने दुषित आढळले.

खराब ब्लिचिंग पावडर

जिल्हा परिषद ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसोबत संबंधीत ग्रामपंचायती पाणी शुध्दीकरणासाठी वापरण्यात येणारी ब्लिचिंग पावडर देखील तपासण्यात येते. डिसेंबर महिन्यांत 360 पावडरचे नमुने तपासण्यात आले. पैकी 12 नमुने निकृष्ठ असल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक निकृष्ट पावडर श्रीरामपूर तालुक्यातील पाच गावातील आहेत. यात माळवडगाव, निपाणी वडगाव, अशोक नगर, उंदिरगाव आणि महाकाळ वडगाव यांचा समावेश आहे. तर नगर तालुक्यातील जेऊर, दरेवाडी यांच्यासह पारनेर तालुक्यातील बाबुर्डी, जातेगाव आणि घानेगाव यांचा समावेश आहे. शेवगाव तालुक्यातील वडुले खु येथील पावडर नमुने निकृष्ठ आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com