देवराई जवळ अपघात; एक ठार तर एक जखमी

देवराई जवळ अपघात; एक ठार तर एक जखमी

करंजी |वार्ताहर| Karanji

नगर-पाथर्डी महामार्गावरील (Nagar Pathardi Highway) देवराई (Devrai) गावाजवळ पिकअप आणि मोटारसायकलच्या अपघातात (Pickups and Motorcycles Accident) मोटारसायकलस्वाराचा जागीच ठार (Death) झाला. तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाला. या अपघातानंतर (Accident) पिकअप गाडी शेजारच्या शेतात जावुन थांबली.

देवराई जवळ अपघात; एक ठार तर एक जखमी
बांधावरील गवत पेटविण्याच्या नादात पोलीस कर्मचार्‍याची गाडी जळाली

सविस्तर माहिती अशी की, नगर-पाथर्डी महामार्गाचे (Nagar Pathardi Highway) काम चालु आहे. या रस्त्यावरील देवराई गावाजवळ रविवारी सायंकाळी तिसगावच्या दिशेने चाललेली पिकअप (एम.एच. 05 बीएच 6036) आणि समोरुन तिसगाववरुन (Tisgav) येणार्‍या मोटारसायकल (एम.एच.-16-बीजी-8398) यांच्यात समोरासमोर जोराची धडक (Accident) झाली. या अपघातात मोटारसायकलवरील सुनिल भरत बर्डे (वय 21 रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी) हा जागीच ठार (Death) झाला. तर अविनाश बाळासाहेब जाधव (वय 19 रा. कौडगाव ता. पाथर्डी) हा तरुण गंभीर जखमी झाला.

देवराई जवळ अपघात; एक ठार तर एक जखमी
आतापर्यंत 1 हजार 699 गुरूजींच्या बदल्या

पिकअपच्या चालक मालकाचे नाव समजु शकले नाही. समोरासमोर झालेल्या या अपघातात (Accident) पल्सर गाडीचे मोठे नुकसान झाले तर पिकअप गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने पिकअप गाडी शेजारच्या शेतात जावुन थांबली. पाथर्डी पोलिस स्टेशनला (Pathardi Police Station) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या महामार्गाचे काम गेल्या महिन्यात दोन महिन्यापासून वेगाने सुरू आहे असे असले तरी अपघात देखील सुरूच आहेत.

देवराई जवळ अपघात; एक ठार तर एक जखमी
शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रांवर अधिकार्‍यांची करडी नजर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com