नगर-परळी रेल्वे मार्गासाठी 150 कोटी

नगर-परळी रेल्वे मार्गासाठी 150 कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठवाड्यातील खासकरून बीड जिल्ह्यातील दळणवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्‍या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला 150 कोटी रुपयांचा आणखी निधी शिंदे सरकारने उपलब्ध करून दिला आहे.

या मार्गाच्या 4508.17 कोटींच्या अंदाजित खर्चास राज्य सरकारने दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्पाच्या खर्चापैकी 2402.59 कोटी एवढा 50 टक्के हिस्सा राज्य सरकारने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2022-23 या वर्षासाठी 150 कोटी रुपये वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वीच नगर ते आष्टी रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आलेली आहे. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे.या अंतर्गत नगर ते आष्टी या 64 किलोमीटर रेल्वेमार्गाचे तसेच पूल, स्टेशन आदी कामे 100 टक्के पूर्ण झाली आहेत. आता या निधीमुळे कामाला वेग येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com