नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

माजी मंत्री प्रा शिंदे यांच्या प्रभागांमध्ये गाठीभेटी
नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

आगामी होणार्‍या कर्जत नगरपंचायत च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मंत्री राम शिंदे यांचा कर्जत शहरातील अनेक प्रभागांमध्ये जाऊन भाजपचे कार्यकर्ते नागरिक व्यापारी पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत .

निवडणुकीच्या दृष्टीने शहरातील भाजपसह राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आरपीआय बहुजन वंचित आघाडी बहुजन समाज पार्टी यासह सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी सुरू झाल्याची दिसून येते. भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासह अनेक नगरसेवक व काही पदाधिकार्‍यांनी भारतीय जनता पक्ष मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे भाजपला कर्जत शहरांमध्ये मोठा धक्का बसला आहे, नगरपंचायत ची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता पाहून माजी मंत्री राम शिंदे यांनी या घटनेनंतर शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन स्वतः कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे काम सुरू केले आहे.

याच अनुषंगाने शहरातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या प्रभाग 14 यामध्ये भाजपचे मोबीन भाई बागवान यांच्यासह पदाधिकार्‍यांची त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राम शिंदे यांच्या शहरातील भेटीगाठी मुळे भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढल्याचे चित्र आहे. यावेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मनीषा ताई वडे, अक्षय माळवे , सागर (पप्पू) सुर्वे, सागर साळुंके, कय्युंम बागवान, मयूर सुर्वे, सार्थक वडे, गौरव साळुंके शफी सय्यद, नवनाथ कसाब, इसराइल पठाण, आशिष पवार, यादी. उपस्थित होते.

Related Stories

No stories found.