नगर : जिल्हयात आजपर्यंत 31 हजाराच्या वर रूग्ण करोनामुक्त

आज 62 बाधितांची रुग्णसंख्येत भर
नगर : जिल्हयात आजपर्यंत 31 हजाराच्या वर रूग्ण करोनामुक्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज तब्बल एक हजार 1055 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 31 हजार 191 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.93 टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 62 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3711 इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 28, संगमनेर 04, नगर ग्रामीण 03, श्रीरामपूर 01, कॅंटोन्मेंट 02, नेवासा 02, श्रीगोंदा 12, पारनेर 01, अकोले 01, राहुरी 04, कोपरगाव 01, मिलिटरी हॉस्पिटल 02 आणि शहराबाहेरील 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एक हजार 1055 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 353, संगमनेर 32, राहाता 118, पाथर्डी 34, नगर ग्रा 96, श्रीरामपूर 71, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 58, श्रीगोंदा 33, पारनेर 41, अकोले 33, राहुरी 68, शेवगाव 10, कोपरगाव 34, जामखेड 33, कर्जत 25, मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com