sugar factory
sugar factory
सार्वमत

जिल्ह्यात गाळपासाठी यंदा 110 लाख हेक्टर ऊस

23 कारखाने : साखर कारखानदारीसाठी आशादायक चित्र

Dnyanesh Dudhade

Dnyanesh Dudhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

गत हंगामात उसाची टंचाई असल्याने नगरसह राज्यातील साखर कारखानदारी अडचणीतून गेली. कमी उसामुळे गाळप हंगाम कालावधी कमी झाल्याने त्याचा आर्थिक फटका साखर कारखान्यांना बसला. परिणामी कारखान्यांवरील कर्जाचा डोंगर आणखी वाढला. मात्र, यंदा निसर्गाने साथ दिल्याने जिल्ह्यात मुबलक ऊस आहे. जिल्ह्यात यंदा गाळपासाठी 110 लाख हेक्टर उसाची नोंद प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयाकडे झाली आहे.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या आकडेवारीनूसार नगर जिल्ह्यात यंदा गाळपासाठी जिल्हा कार्यक्षेत्रात 90 लाख आणि कार्यक्षेत्राबाहेर 20 लाख हेक्टर ऊस असा 110 लाख हेक्टर ऊस गाळपासाठी आहे. नाशिक जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे 10 लाख कार्यक्षेत्रातील आणि कार्यक्षेत्रबाहेरील 2 लाख असे 12 लाख हेक्टर ऊस गाळपासाठी आहे.

अशा प्रकारे नगर विभागात नाशिक आणि नगर मिळून येत्या हंगामासाठी 122 लाख हेक्टवर ऊस गाळपासाठी आहे. नगर जिल्हा हा साखर कारखानदारीचा आगार आहे. मात्र, गतवर्षी कमी ऊसामुळे गाळपाचा असणार्‍या चार महिने देखील कारखाने सुरू राहिले नाहीत. कमी गाळपामुळे कारखान्यांचे आर्थिक गणितच बिघडले.

गत हंगामात अवघा 49 लाख 84 हजार मेट्रीक गाळप झाले होते. यंदा मात्र, जिल्ह्यातील साखर कारखानदारीसाठी आशादायी वातावरण आहे. सर्वच कारखान्यांकडे समाधानकारक गाळप होईल, ऐवढा ऊस असल्याचे सध्या दिसत आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक ऊसाची नोंद भेंड्याच्या ज्ञानेश्वर साखर कारखान्यांने साखर सहसंचालक यांच्याकडे केली आहे. कारखान्यांकडे 15 हजार 326 आहे. जिल्ह्यात 23 साखर कारखाने असून त्यात 9 खासगी तर उर्वरित सहकारी साखर कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांनी त्यांच्या गाळपासाठी ऊस असल्याची नोंद साखर कार्यालयाकडे केली आहे. यामुळे जवळपास हे कारखाने सुरू होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.

कारखानानिहाय ऊस (हेक्टरमध्ये)

अगस्ती 5 हजार 188, अशोक 6 हजार 980, डॉ. तनपुरे 4 हजार 725, डॉ. विखे 5 हजार 771, श्री ज्ञानेश्वर 15 हजार 326, श्री गणेश 2 हजार 883, केदारेश्वर 2 हजार 991, काळे 2 हजार 144, कुकडी 5 हजार 458, मुळा 8 हजार 888, थोरात 3 हजार 653, संजीवनी 2 हजार 528, नागवडे 5 हजार 107, वृध्देश्वर 5 हजार 912, क्रांती शुगर 1 हजार 964, पियुष शुगर 2 हजार 412, गंगामाई 6 हजार 278, अंबालिका 5 हजार 728, जयश्रीराम 720, प्रसाद 5 हजार 125, श्री साईकृपा देवदैठण 2 हजार 350, श्रीसाईकृपा हिरडगाव 4 हजार 550, युटेक शुगर 3 हजार 296 एकूण 109 लाख 977 हजार हेक्टर ऊस गाळपासाठी उभा आहे.

केंद्राच्या पॉकेजकडे लक्ष

येणार हंगाम सुरू होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात उस शिल्लक असला तरी कारखाने सुरू करण्यासाठी मोठ्या अर्थ पुरवठ्याची गरज आहे. गत हंगामात वाढलेले कर्ज, साखरेचा पडलेल भाव यामुळे साखर कारखानदारी कर्जाच्या बोजाखाली दबून आहे. यामुळे राज्यातील साखर कारखान्यांचे केंद्र सरकारच्या पॉकेजकडे लक्ष असून केंद्र सरकार या उद्योगासाठी कशी मदत करणार यावर देखील हंगामाचे चित्र अवलंबून राहणार आहे.

नगर जिल्ह्याचे चित्र

* एकूण कारखाने 23

* सहकारी साखर कारखाने 14

* खासगी साखर कारखाने 9

* एकूण गाळपासाठीचा ऊस 110 लाख मेट्रीक टन

* गतवर्षी 49 लाख 84 गाळप झाले

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com