नगरची बाजारपेठ पुन्हा सुरू
सार्वमत

नगरची बाजारपेठ पुन्हा सुरू

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

बफर झोनमधून बाहेर पडलेली नगरची बाजारपेठे आज सोमवारपासून पूर्ववत सुरू झाली आहे. करोनामुळे चर्चेत आलेला कापडबाजारही आज नव्या जोमाने सुरू झाला आहे.

आडतेबाजारात करोना बाधितांची संख्या वाढल्यानंतर तो भाग महापालिकेने कंटेनमेंट जाहीर केला. त्या आजूबाजुला बफर झोन असल्याने अख्खे मार्केट बंद झाले. गत 14 दिवस नगरची ही मुख्य बाजारपेठ बंद होती. कंटेनमेंट झोनची मुदत काल संपली.

त्यातच नवे बाधितही सापडले नाहीत. त्यामुळे हा भाग कंटेनमेंटमधून बाहेर आला. आज सोमवारी सकाळी आडतेबाजार, दाळमंडई, कापडबाजार, मोची गल्ली भागातील दुकाने उघडली. तेथील व्यवहार पूर्ववत सुरू झाला. व्यावसायिकांनी दुकाने उघडली असली तर ग्राहकांनी मात्र पाठ फिरविल्याचे दिसून आले.

Deshdoot
www.deshdoot.com