नगर बाजार समिती : 18 जागेसाठी विक्रमी 228 अर्ज दाखल

अनेक दिग्गजांनी भरले अर्ज
नगर बाजार समिती
नगर बाजार समिती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 जागेसाठी 228 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी झाली होती. अनेक दिग्गजांचे अर्ज दाखल केल्याने ही निवडणुक लक्षवेधी ठरणार आहे.

दरम्यान निवडणुकीसाठी तब्बल 228 अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्याच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 186 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोसायटी मतदार संघातून एकूण 134, ग्रामपंचायत मतदार संघातून 66, व्यापारी/आडते मतदारसंघातुन 12, हमाल मापाडी मधून 16 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. एकूण 228 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया अमोल कोतकर, युवा नेते संदीप कर्डिले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, अंकूश शेळके, सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, उद्योजक अजय लामखडे यांच्यासह तालुक्यातील अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोणी कोणत्या गटाकडून अर्ज दाखल केला आहे हे अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल. मात्र दिग्गज निवडणुकीत उतरल्याने निवडणूक लक्षवेधी होण्याचे चिन्हे आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com