नगर बाजार समितीकडून 100 बेडचे कोविड आयसोलेझेन सेंटर

माजी आमदार शिवाजी कर्डिले : ग्रामीण भागातील रुग्णांची होणार सोय
नगर बाजार समितीकडून 100 बेडचे कोविड आयसोलेझेन सेंटर
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना वाढणारी चैन तोडायची असेल तर लॉकडाऊन बरोबर आयसोलेझेन कोवीड सेटंरची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकाना उपचारची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीने वांळुज येथील रामसत्य लॉन येथे 100 बेडची व्यवस्था केली असल्याचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी सांगीतले.

वांळुज (ता. नगर) येथील या आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन आ. बबनराव पाचपुते, आ.संग्राम जगताप, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्डीले, नगर तालुक्यात करोना रुग्णाची संख्या वाढत आहे. ऑक्सीजन तसेच इंजेक्शन मिळत नसल्यामुळे नागरिक घरीच उपचार घेत आहेत. या रुग्णाच्या संसर्गमुळे घरातील लोकांना तसेच परिसरात ही रुग्ण संख्या वाढत आहे. शहरातील रुग्णालयात ग्रामीण भागातील रूग्णाना उपचार घेण्यासाठी परवडत नाही. या रुग्णांची सोय व्हावी, या हेतुने बाजार समितीच्यावतीने कोवीड सेंटर सुरू केले आहे.

यावेळी उपसभापती संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डीले, बाबा पाटील खर्से, रेवणनाथ चोभे, बन्सी कराळे, बाळासाहेब निमसे, दिलीप भालसिंग, शरद बोठे, सुभाष निमसे, महादेव शेळमकर, बाळासाहेब दरेकर, विजय शेळमकर, नवनाथ हिंगे, राजु हिंगे, विकास म्हस्के, भरत दरेकर, रमेश दरेकर, सुखदेव दरेकर, अनिल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती माडगे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, नायब तहसील माधव गायकवाड, रुईछत्तीशी सरपंच मंडल अधिकारी वैशाली साळवे, वाळूंज उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी योगिता चौकडे, आरोग्य सेविका उषा सावंत, वाळकी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल ससाणे, ग्रामसेविका अश्विनी बरबडे, तलाठी मोहसीन पठाण, उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com