नगर मनमाड महामार्गावर थातुरमातुर मलमपट्टी- बाणाईत

ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
नगर मनमाड महामार्गावर थातुरमातुर मलमपट्टी- बाणाईत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

नगर मनमाड महामार्गावरील (Nagar Manmad Highway) रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कोपरगाव ते कोल्हार (Kopargav-Kolhar) दरम्यान खड्डे बुजवण्याचे (pits is in progress) काम सुरू आहे. मात्र बुजवलेल्या खड्ड्यांवर थातुरमातुर मलमपट्टी केली जात असून त्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. खड्ड्यांंमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून ठेकेदाराला काळ्या यादीत (Contractor Black List) टाकून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू (Minister of State Bachchubhau Kadu) यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे जनशक्ती प्रहार पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष अमोल बाणाईत यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, नगर मनमाड महामार्गावरून दररोजची हजारो वाहने तसेच मालवाहू कंटेनर वाहतूक करत असतात. कोपरगाव ते कोल्हार दरम्यान मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. यामुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने (Public Works Department) मध्यंतरी खड्डे बुजवण्याचे काम ठेकेदाराकडून करवून घेतले परंतु काही महिन्यांतच बुजवलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत. मागील दोन महिन्यांपूर्वी सावळीविहीर (SavalVihir) नजीक अपघातात एका युवकाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू (Death) झाला. ही घटना ताजी असताना या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत. यामध्ये जर अपघातात बळींची आकडेवारी काढली तर शेकडोंच्या घरात पोहचली आहे. यास सर्वस्वी ठेकेदार जबाबदार आहे.

सदर महामार्गासाठी साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून अद्यापही खड्डे बुजवले गेले नाही. खड्डे बुजवताना निकृष्ट दर्जाचे साहित्य (Inferior Material) वापर केल्याने पुन्हा खड्डे पडल्याने संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यास काळ्या यादीत समाविष्ट करावे यासाठी आपण आमच्या पक्षाचे अध्यक्ष ना. बच्चुभाऊ कडू यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे बाणाईत (Banait) यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com