अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सावळीविहीर नगर मार्गाचे काम खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यामुळे मार्गी लागणार आहे.

तसेच सध्या नगर मनमाड रस्त्यास पडलेले खड्डे बुजविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नातुन 40 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन जाणार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती पिंपळसचे माजी सरपंच भारत लोखंडे यांनी दिली.

नगर मनमाड रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी गुडघाभर खोल खड्डे या रस्त्यावर आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात झाले. तसेच पुणतांबा चौफुलीजवळ तर मालट्रक पलटी झाला. या खड्ड्यांच्या मालिकेमुळे अनेक वाहने खिळखिळी झाली आहेत. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत. शिवाय वाहने हळु चालवावी लागत असल्याने वेळेचा दुरुपयोग होतो.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून निधी मागितला. त्यामुळे मंत्री चव्हाण यांनी आ. विखे पाटील यांच्या आग्रहावरुन 40 कोटीचा निधी मंजुर करवून घेतला. त्यामुळे आता हे खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे.

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सावळीविहीर ते विळद (नगर) पर्यंत रस्ता संपूर्ण डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी केंद्रीय रस्ते व वाहातुक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरला व त्या रस्त्याच्या कामाचा वर्षभरापासुन पाठपुरावा केला. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीम महामार्गात समावेश करुन 160 क्रमांक या महामार्गास देण्यात आला आहे. बायपासवरुन जाण्याचे या महामार्गाचे नियोजन होते.

परंतु खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डी-राहाता असा हा महामार्ग करण्यासाठी आग्रह धरला. यामुळे निघोज निमगावपासुन तर पिंप्रीनिर्मळ या अंतरातील पेट्रोलपंप, तसेच इतर व्यावसायिकांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या संपुर्ण रस्त्यासाठी 450 कोटी रुपये मंजुर करवून घेतले.

चौपदरी असलेला रस्ता सावळीविहीर ते पिंपळस हद्दीतील राहाता न्यायालय, तसेच तिसगाव ते कोल्हार या अंतरात सिमेंट क्रॉकिटचा रस्ता होत असल्याने मजबुतपणा या रस्त्याला येणार आहे. खा. विखे पाटील यांच्या संपुर्ण राहाता तालुक्यातुन कौतुक होत आहे. असे भारत लोखंडे यांनी सांगितले.