नगर-मनमाड रोडवर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात

नगर-मनमाड रोडवर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात
File Photo

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहरातील नगर-मनमाड महामार्गावर आपणा बाजार समोर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे झालेले आहेत. सध्या शहरासह परिसरामध्ये रिमझिम पाऊस सुरु आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही त्यामुळे अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे पडत असून छोटे-मोठे अपघात याठिकाणी घडत आहेत.

अनेक वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोठी कसरत याठिकाणी चालकाला करावी लागत आहे. शहरातील येवला नाका ते मालेगावपर्यंत रस्त्याचा टोल नाका पिंपळगाव जलाल येथे आहे. मात्र दररोज लाखो रुपयांचा टोल वसूल केला जात असताना रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. बुधवारी कोपरगाव येवला नाका अपना बाजार समोर अनेक दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे पडल्याचे चित्र सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे. निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यावरच प्रशासनला जाग येईल का? असा सवाल स्थानिक नागरिक करताना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com