राहुरी खुर्दला 4 हजार किलो जनावरांची कातडी जप्त

बेकायदा वाहतूक करणार्‍या टेम्पोवर कारवाई || श्रीरामपूरच्या दोनजणांना अटक
राहुरी खुर्दला 4 हजार किलो जनावरांची कातडी जप्त

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर मनमाड महामार्गावरून (Nagar-Manmad Highway) आयशर टेम्पोत गोवंश जनावरांच्या कातडीची (Skins of cattle) बेकायदा वाहतूक (Illegal Transport) होत असल्याची पक्की खबर लागताच श्रीरामपूर (Shrirampur) येथील पोलीस पथकाने राहुरी खुर्द (Rahuri Khurd) शिवारात लावलेल्या सापळ्यात सुमारे 2 लाख 40 हजार रुपये किंमतीची गोवंश जनावरांची तब्बल 4 हजार किलो कातडी पोलिसांनी हस्तगत केली. तर सुमारे 6 लाख रुपये किंमतीचा एक आयशर टेम्पोही पोलीस पथकाने जप्त (Seized) केला आहे. ही कारवाई काल बुधवार दि. 22 रोजी राहुरी खुर्द शिवारात करण्यात आली.

गोवंशीय जनावरांच्या कातडीची अवैध वाहतूक होत असल्याची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (DYSP Sandeep Mitke) यांच्या पथकाला खबर मिळताच पथकाने छापा टाकला.

याप्रकरणी बबलू रऊफ कुरेशी, हारून गणी कुरेशी(श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात पो. कॉ. नितीन शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारहेडा, एएसआय राजेंद्र आरोळे, पो.कॉ. नितीन शिरसाठ आदींनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com