नगर-मनमाड महामार्ग दुरूस्त करा, अन्यथा खड्ड्यात गाडून घेऊ

रस्ता दुरूस्ती कृती समितीचा राहुरी प्रशासनाला इशारा
नगर-मनमाड महामार्ग दुरूस्त करा, अन्यथा खड्ड्यात गाडून घेऊ

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

नगर-मनमाड महामार्गाची (Nagar-Manmad Highway) अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा महामार्ग तातडीने दुरुस्त करा, अन्यथा खडड्यात (Pits) गाडून घेऊ, असा इशारा (Hint) रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या (Road Repair Action Committee) युवकांनी राहुरी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, खड्डे (Pits) बुजविण्यासाठी आलेले 10 कोटी गेले कुठे? असा सवालही नागरिकांनी केला आहे.

राहुरी (Rahuri) येथे तहसीलदार फसियोद्दीन शेख (Tehsildar Fasiuddin Shaikh) यांना माध्यमातून कृती समितीच्या वतीने रस्त्यावर पडलेले खड्डे (PIts) डांबरीकरण करून बुजवा अन्यथा आम्ही रस्त्यातील खड्यात गाडून घेतो अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले, गेल्या दोन वर्षांपासून नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आम्ही समितीच्या माध्यमातून विविध आंदोलने करत आहोत. दरवेळी आंदोलनानंतरच रोडवर पडलेले खड्डे डांबरीकरण (Asphalt pits) करून बुजविली गेली आहेत. मागील वर्षी सन 2020 रोजी सुद्धा याचप्रकारे आंदोलन झाल्यानंतर रोडवरील खड्डे बुजविण्यासाठी 10 कोटींच्या निधीची कामे झाल्याचे बोलण्यात येत होते. पण केवळ एका पावसातच हे 10 कोटी कसे काय वाहून गेले? हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.

प्रत्येकी वर्षी पावसाळा आला की रोडवर पुन्हा जीवघेणे खड्डे तयार होतात व ज्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जातो. मागील वर्षी नगर-मनमाड रोडच्या (Nagar-Manmad Road) पूर्णनिर्मितीसाठी 500 कोटींचा निधी मंजूर (Funding Approved) करण्यात आला आहे. मार्च 2021 पर्यंत या रोडचे काम सुरू होणार, अशी माहिती पसरविण्यात आलेली होती. मात्र, ऑगस्ट 2021 अखेर रोडच्या कामाला सुरुवातही केलेली नाही.

सद्यस्थितीत नगर-मनमाड रोडवर (Nagar-Manmad) दररोज खड्ड्यांमुळे अपघात (Accident) होत असून रोज कुणी ना कुणी या खड्ड्यात पडून आपला जीव गमावत आहे. अथवा त्या नागरिकाला गंभीर स्वरूपाची दुखापतही होत आहे. पुढील 10 दिवसांत जर हे खड्डे व्यवस्थित डांबरीकरण करून बुजविले नाही तर या रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे जर यापुढे अपघातात कुणाचा बळी गेला तर संबंधित ठेकेदाराविरुद्ध कृती समिती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार आहे.

तसेच दि. 11 सप्टेंबर रोजी रोडवर पडलेल्या खड्ड्यात पडून विनाकारण जीव जाण्यापेक्षा कृती समितीचे कार्यकर्ते राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) या ठिकाणी रोडच्या कडेला खड्डे खोदून स्वतःला या खड्ड्यात अर्धे बुजवून घेतील व जोपर्यंत रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करत नाही, तोपर्यंत या खड्ड्यात यास्थितीत राहतील, असा इशारा (Hint) देण्यात आला आहे.

निवेदनावर देवेंद्र लांबे, विराट कदम, श्रीकांत शर्मा, सतीश घुले अमोल वाळूंज, प्रमोद विधाटे, नसीब पठाण, रोहित नालकर, सचिन तारडे, तुषार कदम, प्रसाद कदम, सचिन कदम, नितिन मोरे, विठू राऊत, दुर्वेश वाणी, अमोल कदम, सुहास भांड, बाबासाहेब खांदे, सुजय पुजारी, संतोष कदम, शिवाजी पटारे आदींच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com