नगर-मनमाड रस्त्याचे काम पंधरा दिवसांत सुरु न झाल्यास ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू

खा. डॉ. सुजय विखे यांनी दिला इशारा
नगर-मनमाड रस्त्याचे काम पंधरा दिवसांत 
सुरु न झाल्यास ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

नगर मनमाड महामार्गासाठी (Nagar-Manmad Road) केंद्र सरकारकडून (Central Government) 450 कोटी रुपये मंजूर करून तशी वर्कऑर्डर (Work order) देखील दिली गेली आहे. पावसाच्या कारणास्तव रस्त्याच्या कामाला विलंब होत असेल परंतु येत्या पंधरा दिवसांत काम सुरू होईल असा विश्वास नगर दक्षिणचे खा. डॉ सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यानंतरही काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला (Contractor) पकडून तोंडाला काळे फासू त्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा (Hint) त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

नगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी मंगळवारी सकाळी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Saibaba Trust CEO Bhagyashree Banayat) यांची भेट घेऊन सत्कार केला यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद म्हस्के, डॉ गोकुळ घोगरे,भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, भाजयुमोचे शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. खड्ड्यांसाठी (Pits) वारंवार चर्चेत असलेल्या नगर मनमाड महामार्गासाठी (Nagar-Manmad Highway) खा. डॉ सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्याकडे पाठपुरावा करून या महामार्गासाठी 450 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत. तसेच रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील देखील दाखवला आहे.

यावेळी खा.डॉ विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी सांगितले की पावसाळ्या अभावी कामाला उशीर होत आहे, तोपर्यंत खड्डेे (Pits) बुजवण्यासाठी माजीमंत्री विखे पाटील यांनी आदेश दिले आहेत असे सांगत येत्या पंधरा दिवसांत सदरच्या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ठेकेदाराच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा त्यांनी दिला. नगर मनमाड महामार्गावर प्रचंड मोठ मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर प्रवास करताना चांगला रस्ता शोधूनही सापडणार नाही अशी दैनावस्था झाली आहे. अतिशय त्रास सहन करत या रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या प्रवाशांना सहन करावा लागत आहेत. आजही रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजणे अशक्य झाले आहे. दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून आपली वाहने चालवावी लागत आहेत.

निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या नगर-मनमाड महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कश्मीर ते कन्याकुमारी म्हणून या महामार्गाची ओळख आहे. नुकत्याच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्च करून खड्डे बुजविण्यात आले होते, मात्र पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यातील मुरूम वाहून गेल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.याप्रश्नी अनेक राजकीय पक्षांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बसून तसेच वृक्षारोपण करून आंदोलने केली. त्यानंतर तात्पुरती डागडुजी करूनही सदरचा रस्ता दुरुस्त होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे सदरील रस्त्याचे काम येत्या पंधरा दिवसानंतर सुरू होईल असा विश्वास डॉ.विखे पाटील यांनी व्यक्त केल्याने आता हा रस्ता खड्डेमुक्त होईल, अशी अपेक्षा प्रवासी तसेच वाहनचालकांनी बोलून दाखवली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com