शालेय विद्यार्थ्यांनी केले नगर-मनमाड रस्त्यावर पडलले खड्डे व पाण्याचे पूजन

शालेय विद्यार्थ्यांनी केले नगर-मनमाड रस्त्यावर पडलले खड्डे व पाण्याचे पूजन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील साईबाबा भक्त निवास पाचशे रुमजवळ असलेल्या शैक्षणिक संकुलनात दोन ते अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेत जातांना या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रोजच्या या समस्येला कंटाळून विद्यार्थ्यांनी व्यथा मांडण्यासाठी रस्त्याचे पूजन करून पाण्यात फुलं गुलाल अर्पण केला. बाबारे तू व्यवस्थित झाला नाही तरी चालेल पण आमच्या आई वडीलांना आणि कोणत्याही नागरिकांना इजा पोहचवू नको अशी भावनीक साद घातली आहे.

नगर मनमाड रस्त्याची परिस्थिती दिवसागणीक बिकट होत चाललेली असून पडलेल्या रुंद व खोलवर खड्ड्यात पडून अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. हा रस्ता उत्कृष्ट दर्जाचा व्हावा यासाठी जिल्हाभर आंदोलन, निवेदन देऊन झाली मात्र झोपलेल्या प्रशासनाला काही जाग येईना, रस्त्याच्या दयनीय अवस्थेचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही बसत आहे.सध्या सोशल मीडियावर तसेच विविध माध्यमातून नगर मनमाड रस्ता प्रचंड ट्रोल होत असून निर्माण झालेली परिस्थिती आणि वाहन चालकांसह नागरिकांना होणारा त्रास दिवसागणीक वाढत असुन आता या रस्त्याला कंटाळून शालेय विद्यार्थी रस्त्यावर येत असल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com