राहुरी फॅक्टरीवरील अपघातात महिलेचा मृत्यू

महामार्गामुळे आठवड्यात तीन जणांचा बळी
राहुरी फॅक्टरीवरील अपघातात महिलेचा मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) परिसरातील वाणीमळा येथे नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) दुचाकी व मालवाहतूक ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू (Woman Death) झाल्याची घटना काल दुपारी घडली.

दरम्यान, नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे (Nagar-Manmad Highway Pits) हा अपघात झाला असून याप्रश्नी आंदोलन (Movement) छेडणार असल्याचा इशारा वाणीमळा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या महामार्गाने आठवडाभरात एक महिला आणि दोन तरूण अशा तिघांचा बळी घेतला आहे.

वाणीमळा येथील दूध उत्पादक शेतकरी प्रभाकर खांदे व त्यांची पत्नी विमल काल दुपारी दुचाकीवरून मुलीच्या घरी पित्र जेवणासाठी चालले असताना नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) धनलक्ष्मी ट्रॅक्टर्ससमोर पाठीमागून आलेल्या मालवाहतूक ट्रकने खांदे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या विमल खांदे (वय-42) जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती प्रभाकर खांदे किरकोळ जखमी (Injured) झाले आहेत.

अपघाताची माहिती समजताच नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, संदीप वरखडे, संजय वाणी, पवन उर्‍हे, तसेच वाणी, वरखडे, खांदेवस्ती परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी (Rahuri) येथे नेण्यात आला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मध्यप्रदेश राज्यातील मालवाहतूक ट्रकचालक हा पसार झाला. पाठलाग करुन त्यास गुहा (Guha) येथे पकडले. त्याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) गुन्हा दाखल करण्याची प्रकिया उशिरापर्यंत सुरू होती.

Related Stories

No stories found.