खड्ड्यांमुळे मनमाड रस्त्याची झाली चाळण !

दुचाकी सोडा अवजड वाहनांचा प्रवास देखील झाला कठीण
खड्ड्यांमुळे मनमाड रस्त्याची झाली चाळण !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) पडलेल्या खड्डयामुळे (Pit) या ठिकाणी प्रवास करणे धोकेदायक (Dangerous) नव्हे, तर जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. या ठिकाणी पडलेल्या खड्यातून दुचाकी सोडा, चारचाकी वाहने, एसटी (ST Bus), अवजड वाहने (Heavy vehicles) देखील चालवणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मध्यभागावर एक ते दीड फुटा खोलीचे खड्डे पडले असून यात दुचाकी आणि चारकी वाहने आपटून अपघात (Accident) होत आहे.

गेल्या वर्षीच डागडूजी करण्यात आलेल्या नगर-मनमाड (Nagar-Manmad Highway) रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. नगर एमआयडीसी (Nagar MIDC) सोडल्यानंतर पुणे बायपासपासून (Pune Bypass) रस्त्यावरी खड्ड्यांची मालिकाच सुरू होते. त्यात गेल्या काही दिवसांपासून भिज पावसाची (Rain) रिपरिप सुरू असून पडलेल्या खड्डयात पाणी साठलेले असून यामुळे खडड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आणि चाकी वाहने त्या खड्ड्यामध्ये धडपडतांना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पडलेल्या खड्याचा आकार ऐवढा मोठा आहे की त्यातून ट्रक (truck) बाहेर काढणे कसरतीचे ठरत आहेत.

अनेक ठिकाणी एकाच जागी खोले खड्डे पडले असून लांबून त्यांचा अंदाज येत नसून छोट्या कार आणि अन्य वाहनांना त्या आपटून नुकसान होत आहे. या खड्ड्यामुळे रात्रीच्या (Night) अनेक दुचाकी स्वरांची गाड्या घसरून अपघात होतांना दिसत आहे. मनमाड रस्त्याच्या (Manmad Road) दुरावस्थेमुळे या ठिकाणाहून प्रवास करतांना जीव मुठीत धरून मृत्यू (Death) मार्गावरूनच प्रवास करत असल्याचा आभास झाल्याशिवाय राहत नाही. देहेरे गावाच्या (Dehare Village) परिसारात साधारण दीड ते दोनशे मीटर रस्ता फुटलेला असून या ठिकाणी चार चाकी, एसटी नाचत चालली असल्याचा भास होतो. त्यात रात्रीच्या वेळी कोणता खड्डा चुकवू अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग (Department of Public Works), राज्य महामार्ग विभागाला (State Highways Department) या रस्त्याच्या डागडुजीला (Repair) कधी सवड मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला असून या ठिकाणी संबंधीत विभाग मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विळदच्या (Vilad) पाण्याच्या टाकीच्या परिसारात राहुरीच्या (Rahuri) दिशेने पडलेल्या खड्ड्यात गेल्या दोन ते तीन दिवसात अनेक दुचाकी स्वार घरसून पडल्याच्या घटना ताज्यात आहेत. यात संबधितांच्या वाहनाच्या नुकसानीसोबतच दुचाकीस्वार जखमी (Two-wheeler injured) झालेले आहेत.

महामार्गावर साचले तळे

नगर-मनमाड रस्त्यावर नगरपासून राहुरीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यावर पावसात पाण्याचे तळे साचत असून या ठिकाणी असणार्‍या खड्यांत पाणी साठत असून यामुळे अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. मनमाड रस्त्यापेक्षा औरंगाबाद रस्त्याची अवस्था जरा बरी असली तरी दोन्ही रस्त्याची तातडीने दुरूस्ती होणे आवश्यक बनले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com