वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

नगर- मनमाड मार्गावरील घटना श्रीरामपूरच्या तरुणाचा समावेश
वाहनाच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वाहन-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी नगर-मनमाड रोडवरील नांदगाव शिंगवे (ता. नगर) शिवारात घडली. बालाजी रवींद्र गुळवे (वय 34 रा. नांदगाव शिंगवे) व राजू शिवाजी इंगळे (वय 28 रा. श्रीरामपूर) अशी मयत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी बालाजी गुळवे व राजू इंगळे दुचाकीवरून नगर-मनमाड रोडने राहुरीकडून नगरच्या दिशेने येत असताना नांदगाव शिंगवे येथील बस स्थानकाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. या धडकेत बालाजी व राजू यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना संजय गुळवे, अजय बेंद्रे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस अंमलदार डी.बी.पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com