नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी 12 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार

रस्ता दुरूस्तीचे काम बाकी असल्याने मुदतवाढ
नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी 12 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर-मनमाड रस्ता दुरूस्तीच्या (Nagar-Manmad Road Repair) अनुषंगाने विळद बायपास चौक (Vilad Bypass Chowk) ते पुणतांबा फाटा (Puntamba Phata) दरम्यान अवजड वाहतुक 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान बंद करण्यात आली होती. दरम्यान अद्यापही दुरूस्तीचे काम बाकी असल्याने 12 नोव्हेंबरपर्यंत नगर-मनमाड (Nagar Manmad) मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद (Closed to Heavy Traffic) ठेवण्यात आला आहे. यामधून ऊस वाहतुक करणार्‍या वाहनांना वगळण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांनी काढला आहे.

नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी 12 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार
मधुकरराव पिचड हे आदिवासी समाजाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून टार्गेट

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) यांनी नगर- मनमाड महामार्गावरील (Nagar Manmad Highway) विळद बायपास चौक ते पुणतांबा फाटा दरम्यानची अवजड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत विनंती केलेली होती. विळद (Vilad) बायपास चौक ते पुणतांबा (Puntamba) या मार्गावर प्रचंड प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे दुरूस्तीच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येवून वाहतूक कोंडी होत होती. रस्त्यावरून अवजड वाहने लगेच जात असल्यामुळे पुन्हा रस्ता खराब होत होता. त्याचप्रमाणे अवजड वाहनांमुळे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.

नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी 12 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार
रांजणगाव खुर्दमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सदर आदेशातून ऊस वाहतुक करणारी वाहने (ट्रक, ट्रॅक्टर व अन्य वाहने) यांना सुट देण्यात आली आहे. विळद बायपास ते नांदगाव (ता. नगर) पर्यंत दुरूस्तीचे काम पुर्ण झाले आहे. वांबोरी फाटा ते राहुरी, कोल्हार बस स्थानक, बाभळेश्वर टोलनाक्याजवळ व पिंपरी निर्मळ या ठिकाणी काही प्रमाणात दुरूस्तीचे काम बाकी आहे. यामुळे सदर दुरूस्तीकामासाठी अवजड वाहतुक वळविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

नगर-मनमाड रस्ता अवजड वाहतुकीसाठी 12 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार
संगमनेरमधील समनापुर परिसरात पोलीसांनी गांजा पकडला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com