राहुरी खुर्दला अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थी ठार

राहुरी खुर्दला अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थी ठार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) राहुरी खुर्द (Rahuri Khurd) येथे आर्यन पाटोळे या 15 वर्षीय शाळकरी मुलाला अज्ञात वाहनाने धडक (Hit by an Unknown Vehicle) दिल्याने तो जागेवरच ठार (Death) झाला. ही दुर्दैवी घटना काल दि. 18 जून रोजी पहाटेच्या दरम्यान नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar-Manmad Highway) घडली आहे. सध्या या महामार्गाची अत्यंत वाताहात झाल्याने अपघातांबरोबरच (Accident) बळींची संख्याही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

राहुरी खुर्द (Rahuri Khurd) येथील संजीवनी वसाहत येथील अतुल पाटोळे हे बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर आहेत. त्यांना दोन मुले होती. त्यातील आर्यन अतुल पाटोळे हा मोठा मुलगा होता. तो चालूवर्षी विद्यापीठ येथील शाळेत इयत्ता 10 वीच्या वर्गात शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे आपल्या काही मित्रांसोबत तो काल पहाटेच्या दरम्यान त्याच्या सायकलवर राहुरी खुर्द येथून राहुरी शहरात क्लाससाठी येत होता. पहाटे सहा वाजेच्या सुमारास राहुरी खुर्द येथील संजीवनी वसाहतसमोर नगर- मनमाड रस्त्याने (Nagar-Manmad Highway) येत असताना त्याला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) आर्यन अतुल पाटोळे हा शाळकरी मुलगा जागेवरच ठार झाला.

आर्यन याच्याबरोबर आणखी तीन मुले होती. त्यांनी समक्ष अपघात पाहिल्याने ते भयभीत झाले आहेत. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची बातमी कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राहुरी खुर्द परिसरात याबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. आर्यन पाटोळे याचे मामा संपत सर्जेराव दाभाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन व त्यावरील अज्ञात चालकाविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com