नगरने महाराष्ट्रालाही मागे टाकले

बाधितांचा टक्का 25 तर मृत्यूचे प्रमाणही वाढले
नगरने महाराष्ट्रालाही मागे टाकले

अहमदनगर| Ahmednagar| संदीप रोडे

करोना बाधितांच्या टक्केवारीत (पॉझिटिव्हीटी) नगरचे राज्याला मागे टाकले आहे. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17 असून नगर मात्र 25 टक्क्यांपेक्षा पुढे गेले आहे. मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात 1.5 असून नगरचे प्रमाण मात्र 1.13 इतके आहे. सरत्या एप्रिल महिन्यांत जिल्ह्यातील 80 हजार जणांना करोनाची बाधा झाली तर 691 जणांचा बळी घेतला आहे.

नगरमध्ये आजमितीला शंभरामागे 25 जणांची करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येत असल्याने हॉस्पिटल फुल्लं झाली आहेत. रोज 3-4 हजारांच्या घरात बाधित वाढत असल्याने बेड मिळणेही अशक्य झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार नगरचे टक्केवारी राज्यापेक्षाही जास्त आहे. राज्यापेक्षा नगरमध्ये करोनावर मात करण्याचाही टक्काही वाढला असल्याची दिलासादायक बाब या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट 84.06 असून नगरचा 85.66 इतका आहे. मार्च 2020 मध्ये करोनाची नगरमध्ये एन्ट्री झाली. त्या महिन्यांत केवळ 8 बाधित होते. एप्रिलमध्ये 34 बाधित निघाले. त्यानंतर बाधितांची संख्या महिन्यांगणिक तीन आकड्यात पोहचली. पुढे चार आणि पाच आकडी संख्येने करोनाचे पेशंट वाढू लागले.

मार्चमध्ये 19 हजार 41 नव्या बाधितांची भर पडली. एप्रिलमध्ये बाधितांच्या आकड्याने रेकॉर्ड केले. जिल्ह्यातील तब्बल 80 हजार 118 जणांना करोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 2 हजार 71 जणांचा करोनाने मृत्यू झाला. त्यातील 691 मृत्यू हे केवळ एप्रिल महिन्यांतील आहेत.

असे वाढले करोनाग्रस्त

एप्रिल शहर जिल्हा एकूण

1 ते 8 3796 8450 12246

9 ते 14 3967 11969 15936

15 ते 21 5984 16182 22166

22 ते 28 5585 17297 22882

29 ते 1 मे 2389 8718 11107

(1 मे रोजी 4219 बाधितांची भर पडली)

आतापर्यंत 2 हजार 71 बळी

करोनाने जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 71 जणांचा बळी घेतला आहे. यातील सर्वाधिक बळी हे एप्रिल 2021 मध्ये गेले. मार्चमध्ये 153 जणांचा करोनाने मृत्यू झाला. मे च्या पहिल्या दोन दिवसांतच 78 जणांचा करोनाने मृत्यू झाला. तर काल 3 मे रोजी आणखी 57 करोना बळी वाढले आहे. मार्च 2020 मध्ये नगरमध्ये करोनाने एन्ट्री केली असली तरी त्या महिन्यांत एकही मृत्यू झाला नव्हता. एप्रिलमध्ये 2 तर मे 2020 मध्ये 6, जून 10,जुलै 95 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्युचा आकडाही तीन अंकी संख्येत पोहचला.

असे झालेत मृत्यू

- 2020 ची आकडेवारी- मार्च 00, एप्रिल 02, मे 06, जून 10, जुलै 95, ऑगस्ट 295, सप्टेंबर 317, ऑक्टोबर 157, नोव्हेंबर 81, डिसेंबर 89.

- 2021 ची आकडेवारी- जानेवारी 49, फेब्रुवारी 48, मार्च 153, एप्रिल 691 आणि मे (दोन दिवस) 78 आहेत.

टेस्टींग

अ‍ॅन्टीजेन 3 लाख 29 हजार 495

आरटीपीसीआर 3 लाख 85 हजार 586

एकूण तपासणी 7 लाख 15 हजार 081

एकूण बाधित 1 लाख 84 हजार 81

मृत्यू 2 हजार 71

ठणठणीत झालेले 1 लाख 57 हजार 298

अ‍ॅक्टीव्ह 23 हजार 712

लसीकरण

डिपार्टमेंट पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य सेवक 25 हजार 881 16 हजार 463

महसूल 1 हजार 277 767

गृह 3 हजार 299 1 हजार 811

पंचायत राज 3 हजार 363 1 हजार 779

गृहनिर्माण 1 हजार 633 809

रेल्वे 272 183

ज्येष्ठ नागरिक 3 लाख 46 हजार 602

48 हजार 385

एकूण 3 लाख 68 हजार 414

84 हजार 110

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com