नगरच्या तरुणीस श्रीरामपुरात आणले पळवून

शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी केले प्रकरण उघड; मुलगी आई-वडिलांच्या ताब्यात
नगरच्या तरुणीस श्रीरामपुरात आणले पळवून

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील डावखर वस्ती, वॉर्ड नं. 7 या ठिकाणी नगरहून एका मुलीस पळवून आणले. काल शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी या मुलीला पोलिसांच्या सहकार्याने तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले तर त्या तरुणास श्रीरामपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

श्रीरामपूर शहरातील डावखर वस्ती ,वार्ड -07 परिसरात एका तरुणाने नगर येथील अतिक एजाज अकबर शेख, रा. नगर याला आश्रय दिला आहे. अतिक शेख याने नगर तालुक्यातील एका मुलीला पळवून आणले आहे.

ती मुलगी अतिक शेख सोबत डावखर वस्ती येथे आहे. ही बाब शिवप्रहार प्रतिष्ठानच्याकार्यकर्त्यांना समजताच त्यांनी डावखर वस्ती येथे जाऊन या प्रकरणाची शहानिशा केली असता त्यामध्ये सत्यता आढळल्याने शिवप्रहारच्या कार्यकर्त्यांनी अतिक शेखचा श्रीरामपूर स्टाईलने पाहुणचार केला व तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री.वांडेकर यांना याठिकाणी बोलवून घेतले. त्यांनी चौकशी केल्यानंतर असे समजले की,या मुलीच्या वडिलांनी ही मुलगी हरवल्याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यावरून तात्काळ मुलीच्या वडिलांचा संपर्क शोधुन त्यांना कळविले.

पोलिसांनी संपर्क केल्याने मुलीचे वडील व या मिसींगचा तपास करणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार श्री. ससाणे हे श्रीरामपुरात आले आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला नोंद करून त्यांच्या मुलीला ताब्यात घेऊन ते नगरला निघुन गेले. नगर येथुन मुलीला फुस लावुन पळवुन श्रीरामपुरात आणणारा आरोपी अतिक शेख याला श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com