नगर-कल्याण महामार्गावर बस व इको कारचा अपघात; एक ठार, चार जखमी

नगर-कल्याण महामार्गावर बस व इको कारचा अपघात; एक ठार, चार जखमी

घारगाव |वार्ताहर| Ghargav

नगर-कल्याण महामार्गावर राजुरी (जुन्नर) शिवारात बस व इको कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात इको कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (11 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. गुलशन शकील चौगुले (वय 48 रा. राजुरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, नगर कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात आळेफाट्याच्या दिशेने जाणारी बस व राजुरीकडे जाणार्‍या इको कारला समोरासमोर धडक बसली. अपघात इतका भयानक होता की इकोकारचा चक्काचूर झाला. यामध्ये इको कारमधील गुलशन चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मुलगा व चालक यासह दोन मुली असे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले आहे.

बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्याकडेला नालीत गेली. बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी होते, पण बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com