मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्सची धडक; तीन ठार

नगर-कल्याण महामार्गावर घडली घटना
मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्सची धडक; तीन ठार

आळेफाटा | Alephata

नगर-कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावच्याशिवारात चौगुलेवस्तीजवळ मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. हि घटना बुधवारी (७ मे) रात्री आकारावाजेच्या सुमारास घडली. हे अपघातग्रस्त परप्रांतीय असून, आळेफाटा येथे एका खाजगी बेकरीत कामानिमित्त आलेले आहेत. मायातांमध्ये एका अल्पवयीन मजुराचा समावेश आहे.

मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्सची धडक; तीन ठार
संगमनेरात 6 लाख 70 हजार रूपयांची रोकड घेवून चोर पळत होते पुढे झाले असे काही...

अपघातातील मृतांची नावे योगेश रामकुमार (वय २१), चाहात बाबुराव (वय १७), संजीव कुमार (वय २४) सर्व राहणार उत्तरप्रदेश अशी आहेत.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी सांगितले की, आळेफाटा येथे असलेल्या एका खाजगी बेकरीत काम करणारे मजूर बुधवारी रात्री कल्याण रोडवर एकाच दुचाकीने जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना विरुद्ध दिशेने आलेलेया (एमएच ०४ एचवाय ८७३०) टेम्पो ट्रॅव्हल्स बसने दुचाकीवर जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली.

मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्सची धडक; तीन ठार
आ.थोरात दक्षिणेत आल्यास लढत रंजक होऊ शकते, काय म्हणाले खा. विखे...

दुचाकीवरील तिघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागेवरच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी सकाळी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

मोटारसायकलला टेम्पो ट्रॅव्हल्सची धडक; तीन ठार
नगर, संगमनेरच्या घटनांवरून पवार-फडणवीस यांच्यात जुंपली!
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com