नगरमध्ये जम्बो कोव्हिड सेंटरसाठी चाचपणी करण्याचे आदेश

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : मनपा आयुक्तांना निर्देश
नगरमध्ये जम्बो कोव्हिड सेंटरसाठी चाचपणी  करण्याचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरामध्ये करोनाचे दररोज सुमारे 800 ते 900 रुग्ण सापडत आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये शहरामध्ये हजारो रुग्ण करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. शेकडो मृत्यू झाले आहेत.

शहरातील सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब लोकांसाठी मनपाने तातडीने जम्बो ऑक्सिजन कोव्हिड सेंटर उभारण्याची मागणी शहर काँग्रेसच्यावतीने महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या आढावा बैठकीत केली आहे. त्यावर मंत्री ना. थोरात यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना तातडीने याबाबत चाचपणी करण्याचे आदेश बैठकीत दिले आहेत.

यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सिव्हिल सर्जन डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अन्न व प्रशासन उपायुक्त कातकडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, जाहीद शेख आदी उपस्थित होते.

एमआयडीसीतील वखार महामंडळ तसेच मोठ्या प्रमाणात जागा असणार्‍या ठिकाणांचा शोध घेण्याच्या सूचना ना.थोरात यांनी मनपा आयुक्तांना बैठकीत केली. एमआयडीसीमध्ये असणार्‍या ऑक्सिजन प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा सहजपणे होऊ शकतो. त्यामुळे या प्लांट जवळच शक्यतो जागा शोधण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना ना. थोरातांनी बैठकीत केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com