नगरच्या उड्डाणपूलाला अनिल राठोड यांचे नाव द्या
सार्वमत

नगरच्या उड्डाणपूलाला अनिल राठोड यांचे नाव द्या

संभाजी कदम यांची मागणी

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

चाळीस वर्षे नगरकरांना अहोरात्र सेवा देणारे स्व. अनिल राठोड यांचे नाव नगर शहरातील नियोजीत उड्डाणपुलास द्यावे अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.

माजी आमदार स्व. अनिल राठोड यांचे बुधवारी खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 25 वर्षे ते शहराचे आमदार होते. स्व. राठोड यांनी चाळीस वर्षे नगरकरांच्या सेवेसाठी दिवसरात्र दिले. नगरला उड्डाणपुल व्हावा यासाठी त्यांनी आंदोलने, उपोषणंही केली होती. काही काळ ते नगरचे पालकमंत्रीही होते.

नगरकरांसाठी स्व. राठोड यांनी केलेले कार्य नगरकर कधीच विसणार नाहीत. स्व. राठोड यांची आठवण नगरकरांना कायम स्वरूपी रहावी यासाठी नियोजीत उड्डाणपुलास स्व. अनिल भैय्या राठोड असे नाव द्यावे अशी मागणी संभाजी कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. हे पत्र संभाजी कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनाही पाठविले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com